AgroStar
सावधान, शुक्रवारपासून राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज!
हवामान अपडेटअॅग्रोवन
सावधान, शुक्रवारपासून राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज!
➡️ मराठवाडा ते कोमोरीन परिसर आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, मंगळवारपासून (ता. ६) विदर्भात काही प्रमाणात उष्णतेची लाट आहे. आजही विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. दरम्यान शुक्रवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ➡️ दोन दिवसांपासून अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर तेलंगाणा ते तमिळनाडूच्या उत्तर -दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, तमिळनाडूच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. यामुळे उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ होत आहे. ➡️ पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाल्याने पारा ४० अंश सेल्सिअसवर सरकला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उद्या वातावरणात आणखी वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. ➡️ महाराष्ट्रात येथे होणार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शुक्रवार - भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ शनिवार - कोल्हापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ शेतकरी मित्रांनो, वरील हवामानाच्या अंदाजानुसार आपण आपल्या पिकाचे योग्य नियोजन करावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
259
66
इतर लेख