AgroStar
सावधान! या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता!
हवामान अपडेटलोकमत न्युज १८
सावधान! या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता!
➡️ रत्नागिरी जिल्ह्यात 11 व 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 12 जून नंतरदेखील पावसाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगर पालिका आणि 31 गावं धोकादायक आणि पूरग्रस्त असतात. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. तर, ➡️ 10 तारखेपर्यंत मान्सून मुंबईत पोहोचेल आणि त्यानंतर दमदार बॅटिंग सुरू होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाचे जयंता सरकार यांनी मुंबईसाठी वीकएंड अलर्ट ही जारी केला आहे. ➡️ शुक्रवारपासून - 11 जून ते15 जून दरम्यान मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
39
15
इतर लेख