AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सावधान; टोमॅटोच्या वाढतोय या व्हायरसचा प्रादुर्भाव!
सल्लागार लेखकृषी विज्ञान केंद्र - नारायणगाव
सावधान; टोमॅटोच्या वाढतोय या व्हायरसचा प्रादुर्भाव!
सध्या राज्यातील प्रमुख टोमॅटो उत्पादक पट्ट्यामध्ये टोमॅटो पिकामध्ये विविध रोग आढळत आहेत. शेतकऱ्यांनी रोगाची लक्षणे व्यवस्थित अभ्यासून त्यातून तज्ज्ञांचे सहकार्य घेत योग्य त्या उपाययोजना कराव्यात त्यामुळे नुकसानीची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. लक्षणे - • टोमॅटो पिकामध्ये प्रामुख्याने लागवडीनंतर ४५ ते ५० दिवसांनी विषाणूजन्य रोग आढळून येत आहे. सुरवातीच्या ३५ ते ४० दिवसांपर्यंत झाड सुस्थितीत असते. • परंतु एकदा फळ तयार होण्याच्या अवस्थेत आले कि ते आतून काळे पडायला लागते. यात कुकुंबर मोझॅक व्हायरस रोगाचाही प्रादुर्भाव आहे. • लाल रंग येण्याच्या अवस्थेत म्हणजेच पक्वता येण्याच्या काळात फळाचा गढूळ रंग होतो. आतून ते सुरूकतते. वरच्या बाजूचे आवरण पिवळट आणि चकाकी आलेले दिसते. परिणामी फेकून दिल्याशिवाय पर्याय राहत नाही. • काढणी अवस्थेच्या सुरुवातीलाच २० ते ३०% अशी फळे आढळून येतात. तोडे होत जातात तशी रोगग्रस्त फळांची संख्या वाढून ५० ते ६० टक्क्यांवर पोचते. बाग सहाव्या ते सातव्या तोड्याला सोडून द्यावी लागते. सर्व जातींच्या टोमॅटोवर हि लक्षणे दिसत आहेत. • पुणे येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांनी चर्चा केली असता प्राथमिक अंदाज टोमॅटो मोझॅक व्हायरस असावा असा त्यांचा अंदाज आहे. उपाययोजना - • सर्वात प्रभावी उपाय म्हणजे एकात्मिक कीडनियंत्रण. • रोगास प्रतिरोध व सहनशील वाणांचा वापर करावा. • रोप लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड १७.८% एस.एल @५ मिली + मॅन्कोझेब @२० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १० ते १५ मिनिटे बुडवून लावावीत. • लागवडीनंतर ९८% ह्युमिक ऍसिड @१ किलो प्रति २०० लिटर पाणी प्रति एकर तर कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी यांची आळवणी करावी. • लागवडीनंतर ८ ते १० दिवसांच्या अंतराने शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा. संदर्भ:- कृषी विज्ञान केंद्र - नारायणगाव, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
11
इतर लेख