AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सावकारांच्या पाशात न अडकता शेतीसाठी कर्ज घ्या अगदी सहज !
कृषी वार्ताAgrostar
सावकारांच्या पाशात न अडकता शेतीसाठी कर्ज घ्या अगदी सहज !
➡️शेतीसाठी हंगामाला म्हणजे पैशाची गरज भासतेच. बऱ्याच शेतकऱ्यांच्या हाताशी पैसा नसल्यामुळे हातउसने किंवा सावकारांच्या कडून व्याजाने पैसे घ्यायला लागतात.यामध्ये अवाच्या सव्वा व्याज आकारून शेतकऱ्यांची लूट केली जाते. बऱ्याचदा वेळेवर पैसे उपलब्ध न झाल्याने शेतीला लागणारे आवश्यक गोष्टी वेळेवर होत नाही व त्याचा परिणाम थेट उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. ➡️यावर केंद्र सरकारने एक चांगला पर्याय दिला असूनकिसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुणाकडे हात न पसरवतात त्यांना शेता साठी लागणारा पैसा उपलब्ध होतो.या लेखामध्ये आपण किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊ. ➡️किसान क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया : जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या संकेतस्थळाच्या फार्मर्स कॉर्नर वर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला किसान क्रेडिट फॉर्म हा पर्याय दिसतो. तुम्हाला फक्त हा एक पानाचा फॉर्म डाउनलोड करावा लागतो आणि भरावा लागतो. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड चे फोटो कॉपी अपलोड करावी लागते व अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांचा फोटो अपलोड करावा लागणार आहे. ➡️तसेच तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र देखील आवश्यक असते. त्यामध्ये तुम्ही इतर कोणत्याही बँकेकडून कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही किंवा तुम्ही कुठल्याही बँकेचे थकबाकीदार नाहीत, असे त्यावर लिहिलेले असते. नंतर हा फॉर्म भरून तुम्ही जवळच्या बँकेत सबमिट करा. जर तुम्ही भरलेला अर्ज बरोबर असेल तर 14 दिवसांच्या आत किसान क्रेडिट कार्ड तयार केले जाते. तसेच किसान क्रेडिट कार्ड बनवण्याचा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही सी एस सी भारतात कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये देखील अर्ज करू शकतात. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
8
इतर लेख