AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सापळा पीक लावा, किडींना बांधावरच रोखा!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सापळा पीक लावा, किडींना बांधावरच रोखा!
सापळा पिकाची लागवड करताना त्यांची वाढ कशी होते? त्यांना जागा किती लागते? त्यांचा जीवनक्रम, मुख्य पिकाबरोबर पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश याबाबतत माहिती असणे आवश्यक आहे. सापळा पिकांची लागवड ही मुख्य पिकांच्या सभोवताली करतात, याला "पेरीमीटर ट्रॅप क्रॉपिंग' किंवा "पी.टी.सी.' असे म्हणतात. एखाद्या किल्ल्याच्या सभोवताली जशी संरक्षक भिंत असते, तशीच ही पद्धत असते. सापळा पिकाच्या एक किंवा दोन ओळींनी ही भिंत तयार होते. आपल्या शेताचा आकार, मुख्य पिकाचे एकूण क्षेत्र इत्यादीवरून सापळा पिकाचे क्षेत्र अथवा त्याची प्रति चौरस मीटर संख्या (घनता) ठरविता येते. कोणत्या मुख्य पिकात कोणते सापळा पीक घ्यावे हे खाली सांगितले आहे. त्यानुसार आपण सापळा पिकाचे नियोजन करावे. • कापसाच्या पिकात ठराविक ओळींनंतर भेंडी लावली, तर बोंडअळीपासून कापसाचे संरक्षण होते. • भुईमुगात पाने खाणाऱ्या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिकाच्या सभोवताली एरंड किंवा सूर्यफुलाची लागवड महत्त्वाची ठरत असते. • कोबीच्या शेतात मोहरीचे मिश्र पीक घेतल्यास चौकोनी ठिपक्‍याच्या पतंगाचा प्रादुर्भाव कमी होतो. • उसात द्विदल (चवळी) पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास द्विदल पिकातील भक्षक उसावरील लोकरी मावा कमी करण्यास मदत करतात. • उसात कांदा, लसूण, कोथिंबीर घेतल्यास खोड कीड कमी होते. • कापसात तूर अथवा चवळी आंतरपीक घ्यावे, मावा कमी येतो. • टोमॅटोभोवती चार ओळी मका लावल्यास फळ पोखरणारी अळी या किडीपासून संरक्षण होते. • तुरीच्या पिकात सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी पक्षी शेतात येऊन मोठ्या अळ्या वेचून खातात. पक्ष्यांना बसण्यासाठी थांबे करावेत. यासाठी तुरीच्या शेंड्यापासून १.५ फूट उंचीवर लाकडी अँटिना एकरी चार ते पाच बसवावेत किंवा तार बांधावी. • झेंडूची सापळापीक म्हणून तुरीच्या शेताच्या चारही बाजूंनी लागवड करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
95
14