AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सापळा पीक लागवडीचे महत्व आणि फायदे!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
सापळा पीक लागवडीचे महत्व आणि फायदे!
➡️ मुख्य पिकामध्ये येणाऱ्या किडींपासून नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने किडींना संवेदनशील किंवा जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत घेतले जाते, त्यामुळे त्या पिकाकडे कीड आकर्षित होते आणि पर्यायाने मुख्य पिकाचे संरक्षण होते, अशा पिकांना ’सापळा पिके' म्हणतात. ➡️ सापळा पीक वापरण्याची तत्त्वे - - सापळा पीक किडींना आकर्षित करणारे असावे. - सापळा पिकावरील किडींची संख्या खूप वाढल्यास ते उपटून टाकावे किंवा कीटकनाशकाची फवारणी करावी. - सापळा पिकावरील किडींचे अंडीपुंज व किडी गोळा करून नष्ट कराव्यात. ➡️ भुईमूग -- भुईमूग या पिकाच्या बॉर्डर लाइनने सूर्यफुलाची सापळा पीक म्हणून लागवड केल्यास केसाळ अळी, स्पोडोप्टेरा व घाटे अळी या किडी सर्वप्रथम सूर्यफुलाची मोठी पाने व पिवळ्या रंगाच्या फुलांकडे आकर्षित होऊन अंडी घालतात. सूर्यफुलावरील अंडीपुंज प्रादुर्भावग्रस्त पाने अळ्यांसहित नष्ट करावीत. ➡️ उस -- उसात द्विदल (चवळी) पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास द्विदल पिकातील भक्षक उसावरील लोकरी मावा कमी करण्यास मदत करतात. उसात कांदा, लसूण, कोथिंबीर घेतल्यास खोड कीड कमी होते. ➡️ टोमॅटो -टोमॅटोवरील फळ पोखरणारी अळी व सूत्रकृमींच्या नियंत्रणाकरिता टोमॅटो पिकाच्या बॉर्डरलाइनने मुख्य पिकाच्या अंतरानुसार झेंडूची-एक ओळ आणि मका-चार ओळी सापळा पीक म्हणून लागवड करावी. ➡️ कोबीवर्गीय पिके -कोबी, फ्लॉवर इत्यादी कोबीवर्गीय पिकांमध्ये दर 17 ओळींनंतर एक ओळ मोहरी घेऊन आपण या पिकातील चौकोनी ठिपक्‍याच्या पतंग (डायमंड बॅक मॉथ) या किडीची तीव्रता कमी करू शकतो. मोहरी मात्र मुख्य पिकापूर्वी तीन आठवडे आधी पेरावी, त्यावरील कीटक शिफारशीत कीटकनाशकाच्या फवारणीने नियंत्रित करावेत. ➡️संदर्भ :-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
2
इतर लेख