AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सात -बारा आता शेतकऱ्यांसाठी आणखी सोपा!
कृषी वार्ताअॅग्रोवन
सात -बारा आता शेतकऱ्यांसाठी आणखी सोपा!
शेती आणि बिनशेतीच्या उताऱ्याचा नमुना वेगवेगळा असणार आहे .संगणकीकृत सात -बारा उताऱ्यावर आता शासनाचा व ई -महाभूमीचा लोगो असलेला वॉटर मार्क तसेच गावाच्या नावाचा 'एलजीडी कोड' असेल.त्याचबरोबरच शेती आणि बिनशेतीच्या उताऱ्याचा नमुना वेगवेगळा असणार आहे.सर्वसामान्य नागरिकालाही उतारा कळावा,या हेतूने सरकारने हा बदल केला आहे.१५ ऑगस्टपासून राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे. अनेकदा बनावट सात -बारा उतारा दाखवून जमीन लुटणे, तिची खरेदी -विक्री करणे आदी प्रकार घडतात.उतारा शासकीय भाषेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो समजत नाही.त्यातून हे प्रकार घडतात.त्यामुळे संगणकीकृत सात -बारा उतारा आणि आठ (अ) च्या नमुन्यात बदल करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला होता. या बदलामुळे बनवटीगिरीला आळा बसणार आहे. काय बदल होणार जाणून घेऊया - १) सात -बारा व ८(अ) वरच्या बाजूला शासनाचा लोगो व ई -महाभूमीचा वॉटरमार्क २)गावाच्या नावासोबत लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टरी कोड ३)शेतीसाठी हे आर.चौ.मी. आणि बिनशेतीसाठी आर .चौ.मी. हे एकक दर्शविले जाणार ४) खाते क्रमांक खातेदारांच्या नावासोबतच नमूद करणार ५) कमी केलेली नावे खोडणार ६)नमुना ७ वर नोंदवलेले;परंतु न झालेले प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार ७) भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकही फेरफार प्रलंबित नसल्यास तसा उल्लेख करणार ८) नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटच्या फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतर हक्क रकान्याचे खाली शेवटच्या राखण्यात दर्शवणार. संदर्भ - २९ जुलै २०२० अ‍ॅग्रोवन, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
141
12
इतर लेख