AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 सातबारा उतारा होणार बिनचूक, त्रुटी केल्या दूर !
कृषि वार्ताAgrostar
सातबारा उतारा होणार बिनचूक, त्रुटी केल्या दूर !
सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र आणि प्रत्यक्षात जागेवरील क्षेत्रात तफावत, कब्जेदार सदरी असलेल्या नावात चुका, चुकीच्या पद्धतीने झालेल्या नोंदी अशा विविध ४६ प्रकारच्या सातबारातील त्रूटी दूर करण्यात महसूल विभागाला यश आले आहे 👉त्यामुळे राज्यातील सातबारा उतारा बिनचूक करण्याचे काम १९.५५ टक्के पूर्ण झाले आहे. राज्य सरकार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने ई-फेरफार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पातंर्गत राज्यातील २ कोटी ५४ लाख सातबारा उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात येत आहे. राज्यात प्रत्येक विभागात सातबारा उताऱ्यामध्ये नोंदी घेण्याची पद्धत वेगवेगळी होती त्यातून सातबारा उताऱ्यामध्ये विसंगती निर्माण झाल्या होत्या अशा सुमारे ४६ प्रकाराच्या विसंगती स्पष्ट झाल्या होत्या २०१८ पासून सातबारा उतारा बिनचूक करण्याच्या कामाला सुरूवात झाली. 👉जवळपास ९८. ५० टक्के सातबारा उताऱ्यांतील त्रुटी दूर करून त्यांचे संगणकीकरण पूर्ण झाले होते उर्वरित सातबारा उताऱ्यातील दुरुस्तीचे काम मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून काम करण्यात येत आहे. मध्यंतरी कोरोनामुळे हे काम थांबले होते. मात्र त्यानंतर तातडीने हे दुरुस्तीचे काम महसूल विभागाकडून हाती घेण्यात आले. त्यामध्ये आता २ कोटी ५४ लाख सातबारा उताऱ्यांपैकी केवळ ४६ हजार सातबारा उताऱ्यांमध्ये दुरुस्तीचे काम राहिले आहे त्यामुळे जवळपास ९९ ५५ टक्के काम पूर्ण झाले आहे ते देखील लवकरच मार्गी लागले, असे महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले 👉गेल्या शंभर वर्षात सातबारा उताऱ्यातील त्रुटी दूर करण्यात आल्या नव्हत्या. महसूल दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील बिनचूक सातबारा उताऱ्याचे काम करून महसूल विभागाने नवा इतिहास रचला आहे. अचूक सातबारा उताऱ्यांसाठी महसूल विभागाचे सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी कष्ट घेतले त्यामुळे राज्यातील ९९.५५ टक्के सातबारा उतारे बिनचूक झाले आहेत. उवरित सातबारा उतारे दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून लवकरच शंभर टक्के बिनचूक सातबारा उताऱ्यांचे काम होईल. 👉संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
5
इतर लेख