AgroStar
साडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा
नोकरीलोकमत
साडेचारशे पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा
➡️ सोलापूर जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यांतील ४३८ रिक्त पदांची भरती करण्यासाठी १४, १५ आणि १६ जून रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले आहे. ➡️ जिल्ह्यातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पात्रता दहावी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण, बारावी, डिप्लोमा, पदवीधर, पदव्युत्तर पदवी, अशी आहे. ➡️ या मेळाव्यात ट्रेनी, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, विमा सल्लागार, नर्सिंग फार्मासिस्ट, ड्यूटी मेडिकल ऑफिसर, बेड साइड असिस्टंट, एएनएम, बीएस्सी नर्सिंग, जीएनएम पर्यवेक्षिका ही पदे उद्योजकांनी अधिकृत शासकीय संकेतस्थळावर ऑनलाइन अधिसूचित केली आहेत. उमेदवारांच्या मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा फोनद्वारे ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. संदर्भ:- लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
24
15
इतर लेख