कृषी वार्तालोकमत
साखर निर्यातीसाठी मिळणार अनुदान
पुणे – विपणन, अंतर्गत वाहतूक, जहाज वाहतूक अशा विविध खर्चांसह केंद्र सरकार साखर निर्यातीसाठी प्रतिक्विंटल १ हजार ४५ रू. अनुदान मिळणार आहे. पांढरी, कच्ची, रिफाईड अशा सर्व प्रकारच्या साखरेसाठी अनुदान मिळेल. साखर कारखान्यांनी निर्यात योजनेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
आगामी ऊस गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ६० लाख टन साखर निर्यातीची अधिसूचना गुरूवारी प्रसिध्द केली. येत्या १ ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या नव्या साखर हंगामाची सुरूवातीची १४५ लाख टन शिलकी साखरेने होणार आहे. नव्या हंगामातून होणारे अपेक्षित साखर उत्पादन २६३ लाख टन आहे. देशांतर्गत वार्षिक खप २६० लाख टनावर स्थिरावला आहे. हे गणित पाहिल्यास निदान ७० ते ८० लाख टन साखरेची निर्यात होणे गरजेचे असल्याचे वळसे पाटील म्हणाले. संदर्भ – लोकमत, १४ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
50
0
संबंधित लेख