AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
साखरेच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
कृषी वार्तालोकमत
साखरेच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता
कोल्हापूर: आंतरराष्ट्रीय बाजारात यंदा ८२ लाख टन साखरेची कमतरता जाणवेल. अतिरिक्त साखरेमुळे त्रस्त भारताला यामुळे मोठी निर्यात संधी असल्याचे आस्ट्रेलियातील राबो बंक या संस्थेने अहवालात म्हटले आहे. _x000D_ भारत, थायलंड, युरोपियन युनियनमधील साखर उत्पादनात यंदा घट झाली आहे. भारतात तर दुष्काळ, महापूर व अतिवृष्टीसारख्या संकटांमुळे साखऱेचे उत्पादन २१ टक्क्यांनी घटेल असे चित्र आहे. युरोपियन युनियन, थायलंड, पाकिस्तान, चीन या ऊस उत्पादन देशांमध्येही हीच स्थिती आहे. काही देशांनी दर नसल्याने साखर उत्पादान घटविले आहे. _x000D_ परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात साखऱेची मागणी व पुरवठा यातील तफावत ८२ लाख टनांची राहील. यामुळे साखरेचा शिल्लक साठा संपविण्याची संधी भारताला मिळेल. शिवाय वाढत्या मागणीमुळे साखरेच्या किंमती ही वाढतील. साखर कारखान्यांनी या संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त साखर निर्यात केल्यास त्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल. तसेच त्यांना आर्थित मदतीची मागणी न करता ऊसाची एफआरपी देता येईल. _x000D_ संदर्भ – लोकमत, १० जानेवारी २०२०_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
80
0
इतर लेख