AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
साखरेची किमान विक्री ३१ रू.किलो करण्याची शक्यता
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
साखरेची किमान विक्री ३१ रू.किलो करण्याची शक्यता
नवी दिल्ली: केंद्र सरकार साखर करखान्यांना सवलत देण्याकरिता किमान विक्री भाव २९ रू.नी वाढवून ३१ रू. प्रति किलो करण्याची शक्यता आहे. अन्न मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, साखऱेची किमान विक्री भाव वाढविण्याबाबत सचिवांची समूह बैठक झाली होती, ज्यामध्ये एमएसपी २९ रू. वाढवून ३१ रू. करण्याबाबत चर्चा झाली. या प्रकरणात पीएमओमध्ये पूर्वीच चर्चादेखील झाली आहे. या अन्न मंत्रालयाच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकतो.
केंद्राने जून २०१८ मध्ये साखरेचा किमान विक्री भाव २९ रु. प्रति किलो निश्चित केले होते. त्याचबरोबर किमान विक्री भाव २ रु. प्रति किलोग्रॅम वाढीमुळे साखर कारखान्यांना मदत मिळेल की, ज्यामुळे ऊस शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. उद्योगानुसार चालू पेरणीच्या पहिल्या चार महिन्यात, प्रथम ऑक्टोबर २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ पर्यंत ऊस शेतकऱ्यांची थकबाकी वाढवून साखर कारखान्यांपर्यंत २० हजार करोड पोहचले आहे. थकबाकी जमा न झाल्यामुळे साखरेचे प्रमुख उत्पादक राज्य उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात ऊस शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १२ फेब्रुवारी २०१९
0
0