AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
साखरेचा निर्यात हंगाम सुरू
कृषी वार्तापुढारी
साखरेचा निर्यात हंगाम सुरू
कोल्हापूर – देशात नव्या साखरेच्या हंगामाला सुरूवात होण्यापूर्वीच यंदा साखर निर्यातीच्या हंगामाला सर्वप्रथम सुरूवात होत आहे. या हंगाम अंतर्गत केंद्र शासनाने देशातील साखर कारखानदारीपुढे 60 लाख मेट्रीक टन साखर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 ऑगस्ट रोजी 6 हजार 268 कोटी रू. साखर निर्यातीच्या अनुदानाचे पॅकेज जाहीर केले. या अनुदानातून कारखानदारीकडून 60 लाख मेट्रीक टन साखरेची निर्यात अपेक्षित असून अनुदानाच्या योजनेला 1 ऑक्टोबरला प्रारंभ होतो आहे. भारतातील साखर उदयोगांशी संबंधितांनी पूर्व आशिया, चीन, पूर्व आफ्रिका, बांग्लादेश, इराण व श्रीलंका येथील आयातदारांबरोबर यापूर्वीच बोलणी करून करार प्रगतीपथावर आणले आहेत. त्यांची साखर ऑक्टोबरच्या पूर्वार्धात रवाना होऊ शकते. इंडोनेशियानेदेखील भारताबरोबर साखर व्यवहार करण्याचे मान्य केले आहे. संदर्भ – पुढारी, 28 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
75
0