AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 सर्वात शक्तिशाली भाजी- करटोली!
गुरु ज्ञानAgrostar
सर्वात शक्तिशाली भाजी- करटोली!
🌱करटोली ही भारतात डोंगराळ भागात उगवणारी एक वेलवर्गीय वनस्पती आहे. ही भाजी अनेक पोषकतत्वांनी युक्त असल्याचं सांगितलं जातं. तिच्यात औषधी गुणधर्म आहेत. ही भाजी कारल्यासारख्या दिसत असली तरी कारल्यापेक्षा आकाराने लहान असते. या वेलीच्या फळांची भाजी करूनही खातात. 🌱करटोलीला कंटोला, कर्कोटकी आणि ककोरा अशा नावाने देखील ओळखलं जातं. करटोलीत प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, विटामिन ए, विटामिन बी1, बी2, बी3, बी5, बी6, बी9, बी12, विटामिन सी, विटामिन डी2 आणि 3, विटामिन एच, विटामिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पॉटेशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषकतत्वे आढळतात. 🌱करटोलीचा ‘या’ रोगांवर मोठा परिणाम: करटोलीची भाजी अनेक प्रकारच्या आजारांपासून शरीराचं संरक्षण करते. आयुर्वेदात देखील करटोलीला खूप महत्त्व आहे. डोकेदुखी, केस गळती, कान दुखणे, खोकणे, पोटात इंफेक्शन, मुळव्याध, डायबिटीज, खरुच, अर्धांगवायू, ताप, सूज, बेशुद्ध पडणे, सापाने दंश करणे, डोळ्यांच्या व्याधी, कँसर, ब्लड प्रेशर सारख्या अनेक आजारांवर या भाजीचा चांगला परिणाम होतो. 🌱बाजारात करटोलीची भाजी वेगवेगळ्या किमतीला मिळते. तिची किंमत 80 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत असते. या भाजीची किंमत सिझन आणि उपलब्धता यावरच ठरत असते. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
75
11