AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकी ढेप, सोयाबीन दरातील वाढ कायम राहीन
कृषि वार्ताअॅग्रोवन
सरकी ढेप, सोयाबीन दरातील वाढ कायम राहीन
मुंबई: देशातील अनेक भागात २०१८ मधील दुष्काळ व यंदा पीक काढणीच्या काळातील अतिवृष्टीमुळे कमोडिटी मार्केटमधील दरात बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे बहुतेक शेतीमालातील दरवाढ ही २०२० मध्ये कायम राहणार आहे. विशेषत: पहिल्या सहामाहीत दर वाढलेले दिसतील. सरकी ढेप, सोयाबीन दरातील वाढ कायम राहील व सोयाबीन यंदा फ्युचरवर ५२०० रू. प्रतिक्विटलपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज कमोडिटी मार्केटमधील जाणकारांनी व्यक्त केला. _x000D_ देशातील शेतीसाठी २०१८ व २०१९ हे दोन्ही वर्षे कठीण होते. २०१८ मध्ये पडलेला दुष्काळ व २०१९ मध्ये मान्सूनचे उशिरा आगमन, अतिवृष्टी व अतिपावसापासून उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे २०१९ मध्ये बहुतेक शेतीमालाचे दर वाढले होते. मार्केटमधील जाणकराच्या मते, प्रतिकूल हवामानामुळे कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादनात झालेली व पशुखादय उदयोगातून दोन्ही कमोडिटींना वाढणारी मागणी लक्षात घेता सरकी ढेप व सोयाबीनचे दर वाढतील. सोयाबीन दरातील वाढीचा ‘ट्रेंड’ कायम राहून फ्युचरवर क्विंटलला ५२०० रू. जाण्याची शक्यता आहे. सोयाबीनच्या विक्रमी दरामुळे इतर तेलबियांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. _x000D_ संदर्भ - अ‍ॅग्रोवन, ६ जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_
159
0