AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकार ‘हा’ व्यवसाय सुरु करण्यासाठी देणार प्रोत्साहन!
व्यवसाय कल्पनाTV9 Marathi
सरकार ‘हा’ व्यवसाय सुरु करण्यासाठी देणार प्रोत्साहन!
➡️ स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. सरकारने नारळाच्या करवंट्यांपासून गृहपयोगी वस्तू तयार करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. कोकण, उत्तर आणि ईशान्य भारतात या उद्योगाची बाजारपेठ विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे. ➡️ कॉयरच्या जागतिक उत्पादनात भारताचा वाटा ७० टक्के आणि कॉयर उत्पादनांच्या जागतिक व्यापारात ८० टक्के वाटा आहे. अलीकडच्या काळात कॉयर उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात व्यवसाय सुरू करणे हा चांगला पर्याय ठरू शकतो. आजघडीला कॉयर उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 7.3 लाखांहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. त्यापैकी ८० टक्के महिला आहेत. गेल्यावर्षी कोरोना संकटातही उद्योगाने निर्यात प्रमाणात १७ टक्के आणि नारळापासून बनवलेल्या कॉयर उत्पादनांच्या 37 टक्के वाढीसह ३,७७८.९७ कोटी रुपयांची पातळी गाठली आहे. निर्यातीची अमाप संधी ➡️ कॉयर उद्योग हा पारंपारिक, श्रम प्रधान, कृषी-आधारित आणि निर्यात-केंद्रित उद्योग आहे. हा उद्योग टाकाऊतून टिकाऊ वस्तूंची निर्मिती करतो. खादी, गावे आणि कॉयर उद्योगासह देशातील MSME क्षेत्राच्या वाढ आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. काय आहे सरकारची योजना ➡️ कॉयर सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी सरकारने कॉयर उद्यमी योजना चालवली आहे. याअंतर्गत सुलभ अटींवर कर्जासह अनुदानही दिले जाते. यामध्ये ४० टक्के पर्यंत अनुदान मिळते. तसेच कमी व्याज दराने ५५ टक्के पर्यंत कर्ज दिले जाते. क्वॉयरशी संबंधित उत्पादने बनवताना, सरकार तुम्हाला कर्ज, सबसिडी व्यतिरिक्त अनेक सुविधा देते. योजनेत सहभागी होण्यासाठी कशाप्रकारे अर्ज कराल? कोणताही वैयक्तिक, बचत गट, कंपनी, स्वयंसेवी संस्था, सोसायटी, सहकारी संस्था, चॅरिटेबल ट्रस्ट क्वॉयर उद्योजक योजनेमध्ये अर्ज करू शकतात. आपण ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. यासाठी http://coirservices.gov.in/frm_login.aspx वर लॉग इन करून अधिक माहिती मिळवू शकता. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
4
इतर लेख