AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार KCC, अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा फायदा
योजना व अनुदानNews 18 lokmat
सरकार सर्व शेतकऱ्यांना देणार KCC, अशाप्रकारे करा अर्ज आणि मिळवा फायदा
जर तुम्ही देखील शेतकरी असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल.केंद्रीय योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली पाहिजे आणि यामध्ये पैशांची कमतरता अडथळा बनू नये. केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना स्वस्तात मिळते लोन आता केसीसी फक्त शेतीपुरते मर्यादित नाही. पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन करणाऱ्यांना देखील या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. किसान क्रेडिट कार्डद्वारे सरकार शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज देते. कर्जावरील व्याज 9 टक्के असले तरी सरकारकडून 2% सबसिडी मिळते. यामुळे कर्जावर फक्त 7 टक्के व्याज भरावे लागते. कुणाला मिळेल KCC? शेती, मत्स्यपालन आणि पशुपालन करणारी कोणतीही व्यक्ती, जरी ती दुसऱ्याच्या जमिनीवर शेती करत असेल तरीही याचा लाभ घेऊ शकते. याचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल 75 वर्षे आहे. कशाप्रकारे मिळवाल KCC? KCC मिळवणे सोपे आहे. यासाठी आधी https://pmkisan.gov.in/ या अधिकृत साईटवर जा आणि इथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाउनलोड करा. तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जमिनीची कागदपत्रे, पीक तपशीलांसह भरावा लागेल. येथे तुम्हाला हे सांगावे लागेल की तुम्ही इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर कोणतेही किसान क्रेडिट कार्ड बनवले नाही. यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड मिळेल. केसीसीसाठी आवश्यक कागदपत्रे आयडी प्रूफसाठी तुमच्याकडे वोटर ID card/ PAN कार्ड/ पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. तर पत्ता प्रूफ म्हणून देखील वोटर ID card/पासपोर्ट/आधार कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
54
19