AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये देणार!
कृषी वार्ताTV9 Marathi
सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये देणार!
➡️देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक योजना चालवत आहे. यापैकी एक योजना आहे, सरकारची पीएम किसान मान धन योजना. शेतकऱ्यांनाही या योजनेतून दरमहा पेन्शन मिळते. दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळते ➡️या योजनेमध्ये वयानुसार मासिक योगदानावर वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक पेन्शन 3000 रुपये किंवा 36000 रुपये वार्षिक दिले जातात, यासाठी योगदान दरमहा 55 ते 200 रुपये आहे. आतापर्यंत 21 लाखांहून अधिक शेतकरी या योजनेत सामील झालेत. जाणून घ्या तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता. जाणून घ्या ही योजना काय? ➡️18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी किसान पेन्शन योजनेत सहभागी होऊ शकतात, ज्यांच्याकडे लागवडीसाठी जास्तीत जास्त 2 हेक्टर जमीन आहे. त्यांना किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे योजनेंतर्गत सुमारे 55 ते 200 रुपये मासिक योगदान द्यावे लागेल. याप्रमाणे मोफत नोंदणी करा ➡️यासाठी शेतकऱ्याला जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल. यासाठी शेतकऱ्याच्या आधारकार्ड आणि सातबाऱ्याची प्रत घ्यावी लागेल. यासह शेतकऱ्याचे 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि बँकेचे पासबुक देखील आवश्यक असेल. नोंदणीदरम्यान शेतकऱ्याला पेन्शन युनिक नंबर आणि पेन्शन कार्ड दिले जाईल. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क नाही. तुम्हाला मध्येच योजना बंद करायची असेल तर ➡️जर एखाद्या शेतकऱ्याला योजना मध्येच सोडायची असेल तर त्याचे पैसे वाया जाणार नाहीत. ती योजना सोडत नाही तोपर्यंत जमा केलेल्या रकमेवर बँकांच्या बचत खात्याइतकेच व्याज मिळेल. जर पॉलिसीधारक शेतकरी मृत्युमुखी पडला तर त्याच्या पत्नीला 50 टक्के रक्कम मिळत राहील. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
89
22
इतर लेख