AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकार वाटणार १ कोटी मोफत LPG  कनेक्शन, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त!
कृषी वार्ताTV9 Marathi
सरकार वाटणार १ कोटी मोफत LPG कनेक्शन, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त!
👉येत्या दोन वर्षात एक कोटीहून अधिक मोफत एलपीजी कनेक्शन देण्याची आणि लोकांना एलपीजी सहज मिळावा यासाठी सरकारने एक योजना तयार केली आहे. देशातील १०० टक्के लोकांना स्वच्छ इंधन पोहोचवण्याचं उद्दीष्ट साध्य करण्यासाठी ही योजना तयार केली गेली आहे. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे. 👉पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, कमी कागदपत्रं आणि स्थानिक रहिवासी पुरावा नसल्यासही कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. इतकंच नाहीतर, ग्राहकांना तीन डीलर्सकडून पुन्हा एक रिफिल सिलिंडर मिळण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. 👉कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त चार वर्षात गरीब महिलांच्या घरात आठ कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आणि यामुळे एलपीजी वापरणाऱ्यांची संख्या देशात 29 कोटींवर पोहचली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान उज्ज्वला (PMUY) योजनेंतर्गत एक कोटीहून अधिक एलपीजी कनेक्शन देण्याची योजना जाहीर करण्यात आली. 👉सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन वर्षात अतिरिक्त एक कोटी कनेक्शन देण्याचं लक्ष्य ठेवण्याची आमची योजना आहे.’ साधारणपणे इंधन अनुदानाचं वाटप प्रति कनेक्शन 1,600 रुपये खर्च करण्यासाठी पुरेसे असावे. 👉गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल, डिझेल आणि एपीजी गॅस सिलेंडरच्या किमती सातत्याने वाढत आहेत. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. 👉दरम्यान, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती मार्च किंवा एप्रिलमध्ये कमी होऊ शकतात. प्रधान म्हणाले की, तेल उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे, जेणेकरुन भारतातील सामान्य जनतेला तेलाच्या वाढत्या किंमतींपासून दिलासा मिळेल. उत्पादन वाढल्यावर किंमती कमी होणार 👉कोरोनामुळे होणारा खप कमी झाल्यामुळे तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी केले होते. पण आता परिस्थिती सामान्य झाली आहे. तेलाची मागणी वाढली आहे, तरीदेखील उत्पादन वाढवण्यात आलेले नाही. त्यामुळे एलपीजीचा वापर वाढला आणि उत्पादनाअभावी किंमती वाढल्या. तथापि, आता मार्चच्या उत्तरार्धात आणि एप्रिलच्या सुरूवातीला एलपीजीच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल. संदर्भ - TV9 मराठी, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
52
8
इतर लेख