AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकार देणार 4.4 लाख रुपये अनुदान!
कृषि वार्ताAgroStar
सरकार देणार 4.4 लाख रुपये अनुदान!
👉अलिकडच्या काळात सरकार विविध व्यवसाय करण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देते. दरम्यान, तुम्हाला जर व्यवयासायात उतरायचे असेल तर नेमका कोणता व्यवसाय सुरु करावा? असा प्रश्न तुमच्या मनात असतो. तर गावात राहून तुम्ही माती परीक्षण केंद्र उघडू शकता. या व्यवसायासाठी सरकार 4.4 लाख रुपयांचे अनुदान देते. 👉मृदा आरोग्य कार्ड योजना: केंद्र सरकारने माती परीक्षण केंद्रांना प्रोत्साहन देण्यासाठी मृदा आरोग्य कार्ड नावाची योजना सुरू केलीय. या योजनेंतर्गत, पंचायत स्तरावर लहान माती परीक्षण केंद्रे उघडण्यासाठी सरकार मदत करते. या लॅबमध्ये पंचायत आणि आजूबाजूच्या गावांच्या शेतातील मातीची चाचणी केली जाते. या अंतर्गत, तुम्हाला एक वाहन खरेदी करावे लागेल, ज्यामध्ये माती परीक्षण केंद्राची सर्व उपकरणे ठेवता येतील. या वाहनाद्वारे तुम्ही गावोगावी जाऊन माती परीक्षण करून चांगला नफा मिळवू शकता. 👉माती परिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी काय करावं लागेल? - नियमानुसार मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत केवळ 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकच मिनी माती परीक्षण केंद्रे उघडू शकतात. - तसेच, लाभार्थ्यांसाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय त्याला कृषी चिकित्सालय आणि शेतीविषयी चांगले ज्ञान असावे. - सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती शेतकरी कुटुंबातील असणे आवश्यक आहे. - जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि लघु माती परीक्षण केंद्र उघडायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील कृषी कार्यालयात जाऊन उपसंचालक किंवा सहसंचालकांना भेटावे लागेल. 👉माती परीक्षण केंद्र उघडण्यासाठी agricoop.nic.in वेबसाइट आणि soilhealth.dac.gov.in वर अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही किसान कॉल सेंटर (1800-180-1551) वर देखील कॉल करू शकता. सर्व प्रथम कृषी अधिकारी तुम्हाला एक फॉर्म भरण्यासाठी देतील. तुम्हाला फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती कृषी विभागाकडे जमा करावी लागतील. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
0
इतर लेख