कृषि वार्तादैनिक भास्कर
सरकार आर्टिफिशियल इंटेलिजन्सने पीक उत्पादनाचा अंदाज लावणार!
नवी दिल्ली: पीक विमा योजनेअंतर्गत आता, शेतकऱ्यांना विमाची माहिती असावी यासाठी केंद्रशासन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. ग्राम पंचायत स्तरावर पिकाच्या उत्पादनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापर केला जाईल. सरकारच्या या निर्णयामुळे उत्पादनामध्ये अचूक आणि लवकर अंदाज घेण्यास मदत होईल. या खरीफ पिकांच्या हंगाममधील हवामानानुसार पिके घेण्यात येणार आहे, याचा परिणाम २०२० मध्ये दिसून येईल. उत्पादनाच्या अंदाजासाठी वापरले जाणारे तांत्रिक साधनांमध्ये उच्च प्रमाणात तात्पुरती रिमोट सेन्सिंग डेटा, मानव रहित हवाई वाहने, मशीन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा समाविष्ट आहे. त्याचबरोबर सध्या हा अंदाज भात, सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, भुईमूग व गवार या पिकांसाठी हे लागू करणार आहे. एका अधिकारीच्या मतानुसार, आकडेवारी समोर आल्यानंतरच पंतप्रधान प्रधानमंत्री पीक योजना लागू होईल. सध्या, प्रधान मंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तींमध्ये शेतकऱ्यांचे होणाऱ्या उत्पादनाच्या होणाऱ्या नुकसानच्या आकलनसाठी 'क्रॉप कल्टिंग एक्सपिरिमेंट' (सीसीई) चा उपयोग होतो. ज्यामध्ये बराच वेळ लागतो.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर या प्रक्रियेला गती देईल. पायलट प्रकल्प महालनोबिस नॅशनल क्रॉप फॉरकास्ट सेंटर (एमएनसीएफसी) ची देखरेखमध्ये हे आयोजित करण्यात येणार आहे. जे देशातील सुमारे ८०% क्षेत्रातील शेती क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा पातळीवर पिकांच्या उत्पन्नाचा अभ्यास सुरू आहे. संदर्भ - दैनिक भास्कर, २० मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
32
0
इतर लेख