AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; प्रतिमाह 63000 वेतन!
नोकरी ABP Live
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; प्रतिमाह 63000 वेतन!
➡️ अल्पशिक्षित तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी. भारतीय टपाल विभागानं भर्तीसंदर्भातील अधिसूचना जारी केली असून स्टाफ कार ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात. अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वरील भरती विभागात दिलेल्या लिंकवर क्लिक करून थेट भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. १५ मार्च २०२२ रोजी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावं. यासोबतच हलकी आणि जड वाहन चालविण्याचा परवाना असावा. वेतन उमेदवारांचा पगार १९,९०० – ६३,२००/- (स्तर-२) निवड प्रक्रिया उमेदवारांची निवड अनुभव आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. जाणून घ्या किती पदांवर भरती? ➡️ विभागानं प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, स्टाफ कार ड्रायव्हरची पदं जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी, नॉन-राजपत्रित, नॉन-मिनिस्ट्रियल कॅटेगरीमध्ये भरली जातील. भारतीय टपाल विभागानुसार ही भरती एकूण २९ पदांसाठी होणार आहे. त्यापैकी १५ पदं अनारक्षित आहेत. ८ पदं OBC साठी, ३ SC आणि ३ EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांवर थेट भरती होणार आहे. जे दोन वर्षांसाठी असेल. ➡️ हा अर्ज १५ मार्चपर्यंत सीनियर मॅनेजर, मेल मोटर सर्व्हिस, सी-१२१, नरैना इंडस्ट्रियल एरिया फेज-१, नरैना, नवी दिल्ली-११००२८ या पत्त्यावर पाठवा. संदर्भ:- ABP Live, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
16