AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकारी गॅरंटी! 36000 रुपये वार्षिक पेन्शन मिळवा!
समाचारलोकमत
सरकारी गॅरंटी! 36000 रुपये वार्षिक पेन्शन मिळवा!
➡️ केंद्र सरकारच्या अनेक पेन्शन स्कीम म्हातारपणी दर महिन्याला एक ठराविक रक्कमेची गॅरेंटी देतात. जर तुम्ही दर दिवशी केवळ 1 रुपया 80 पैसे जमा केले तर महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळवू शकता. या योजनेचे नाव पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना असे आहे. सरकारची ही योजना असंघटीत क्षेत्रातील श्रमिकांसाठी आहे. ➡️ जर तुमचे महिन्याचे उत्पन्न 15 हजार रपयांपेक्षा कमी असेल आणि वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला सरकारच्या या योजनेत पैसे गुंतवून महिना 3000 रुपयांची पेन्शन मिळविता येते. सरकारची ही गॅरंटीड पेन्शन स्कीम आहे. यामध्ये भाग घेऊन तुम्ही 60 व्या वर्षी महिन्याला 3000 रुपये मिळवू शकता. अटी 1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे महिन्याचे उत्पन्न 15000 रुपयांपेक्षा जास्त असता नये. महिन्याचे उत्पन्न 15 हजारांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही. 2) याचसोबत जे लोक EPFO, NPS, ESIC चे सदस्य आहेत किंवा आयकर भरतात ते लोक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. कोण घेऊ शकतो लाभ... 1) जर गुंतवणूकदार 18 वर्षे वयाचा आहे तो महिन्याला 55 रुपये, 29 वर्षांचा व्यक्ती महिन्याला 100 रुपये आणि 40 वर्षांचा व्यक्ती महिन्य़ाला 200 रुपये भरू शकतो. तुम्ही जेवढे पैसे टाकाल तेवढेच पैसे सरकार टाकणार आहे. कागदपत्र... ➡️ पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेमध्ये खाते उघडण्यासाठी मुख्यत्वे तीन कागदपत्र लागतात. आधार कार्ड, आय़एफएससी कोडसह सेव्हिंग किंवा जनधन खाते आणि वैध मोबाईल नंबर.असंघटीत क्षेत्रात अनेक प्रकारची कामे आणि व्यवसाय असल्याने त्या लोकांची एका ठरावीक कामासाठी नोंद करणे कठीण आहे. योजना कुठे मिळेल? ➡️ ईपीएफओच्या वेबसाईटवरून तुम्हाला जवळच्या कॉमन सर्हिस सेंटर (CSC) चा पत्ता घ्यावा लागेल. याशिवाय एलआयसीची शाखा, राज्य कर्मचारी विमा निगम (ईएसआयसी), ईपीएफओ किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या लेबर ऑफिसमध्ये जाऊन अर्ज करता येणार आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत . हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
59
5
इतर लेख