AgroStar
सरकारच्या या योजनेद्वारे मिळणार पती-पत्नीला दरमहा 10 हजार रुपये !
योजना व अनुदानAgrostar
सरकारच्या या योजनेद्वारे मिळणार पती-पत्नीला दरमहा 10 हजार रुपये !
➡️मोदी सरकारकडून अशा अनेक योजना जातात त्याचा अनेकांना फायदा होत असतो. मग ते शेतकऱ्यांसाठी असो किंवा मग वृद्ध नागरिकांसाठी. मोदी सरकारची अशीच एक योजना आहे त्यातून पती पत्नीला महिन्याकाठी 10 हजार मिळू शकतात. ➡️अटल पेन्शन योजनाही सरकारची अशीच एक पेन्शन योजना आहे, ज्या अंतर्गत गरीबांना सेवानिवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळू शकते. या सरकारी योजनेंतर्गत निवृत्ती वेतनाच्या लाभाची हमी सरकार देते. याची सुरुवात 1 जून 2015 रोजी झाली.अटल पेन्शन योजनेंतर्गत, तुम्हाला योगदानानुसार दरमहा 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये किंवा रुपये 5000 रुपये पेन्शन मिळू शकते. अटल पेन्शन योजनेत सामील होण्यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे आहे. APY अंतर्गत कोणत्याही सदस्याचा किमान योगदान कालावधी 20 वर्षे किंवा त्याहून अधिक असू शकतो. ➡️पती-पत्नीला दरमहा 10,000 रुपये मिळू शकतात : तुम्ही विवाहित असाल तर तुमच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. म्हणजेच, अटल पेन्शन योजनेंतर्गत, पती-पत्नी दोघेही स्वतंत्र खाते उघडू शकतात आणि दरमहा 10,000 रुपये पेन्शन घेऊ शकतात. ➡️तुम्हालाही याचा लाभ घ्यायचा असेल, तर असा अर्ज करा : 👉प्रथम ऑनलाइन एपीवाय सबस्क्राइबर नोंदणीवर जा (How to register for APY) 👉नोंदणी तपशील भरा जसे की बँक खाते क्रमांक, ई-मेल आयडी, आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक इ. 👉तुमच्या पेपरलेस ऑफलाइन eKYC साठी कोड एंटर करा. 👉नंतर कॅप्चा प्रविष्ट करा आणि सुरू ठेवा वर क्लिक करा. 👉एपीवाय खाते उघडण्यासाठी तुम्ही बँकेच्या शाखेलाही भेट देऊ शकता. येथे तुम्हाला नोंदणी फॉर्म सबमिट करावा लागेल. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
11
इतर लेख