समाचारTV9marathi
सरकारच्या ‘या’ योजनेत तुमच्या मुलीला 15 लाख मिळणार!
➡️ जर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करण्याचा विचार करत असाल तर पंजाब नॅशनल बँक तुम्हाला एक विशेष सुविधा देत आहे. बँकेच्या या ऑफरमध्ये तुम्ही तुमच्या मुलीसाठी 15 लाख रुपये सहज वाचवू शकता. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडून तुम्ही तुमच्या मुलीला करोडपती बनवू शकता. या खात्याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
तुम्ही 15 लाख रुपये कसे कमवाल?
➡️ या योजनेमध्ये पालक एका मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडू शकतात आणि दोन वेगवेगळ्या मुलींच्या नावे जास्तीत जास्त दोन खाती उघडता येतात.
➡️ यामध्ये किमान रक्कम 250 रुपये जमा करावी लागते. या व्यतिरिक्त तुम्ही जास्तीत जास्त 1,50,000 रुपयांपर्यंत पैसे जमा करू शकता. हे खाते उघडून तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून आणि पुढील खर्चापर्यंत मदत मिळणार आहे.
➡️ सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर वार्षिक व्याजदर 7.6 टक्के आहे. हे व्याजदर केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी सुधारित करते. यामध्ये अनेक लहान बचत योजनांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांना या योजनेत कर सूटचा लाभही मिळतो.
➡️ मुलगी 18 वर्षांची झाल्यास सुकन्या समृद्धी खाते उघडण्याच्या तारखेपासून किंवा लग्नाच्या वेळी (लग्नाच्या तारखेनंतर 1 महिना आधी किंवा तीन महिन्यांनी) 21 वर्षांनी मॅच्युरिटी होते.
कोणती कागदपत्रे द्यावी लागतील?
➡️ सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलीचा जन्म दाखला फॉर्मसह पोस्ट ऑफिस किंवा बँकेत सादर करावा लागेल. याशिवाय मुलाचे आणि पालकांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) आणि ते कुठे राहत आहेत, याचा पुरावा (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल) सादर करावा लागेल.
➡️ अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://tinyurl.com/rwy2e9je
👉 अॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- TV9 Marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.