कृषी वार्ताAgrostar
सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यासाठी 187 कोटी मंजूर !
➡️शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या पीक विमा योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.राज्य शासनाच्या हिश्याची १८७ कोटी १५ लाख ६५ हजार ७३ रुपये शासनाने विमा कंपन्यांना दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीतील पीक विमा मिळणे निश्चीत झाले असून सद्यस्थितीला आर्थिक संकटात उभे असलेल्या शेतकऱ्यांना हा दिलासा मिळाला आहे.
➡️केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त भागीदारातुन प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविल्या जाते. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरला आहे अशांना नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा दिला जातो.
➡️सन २०२१-२२ मधील रब्बी हंगामातील पिकांवर गारपीट त्याचप्रमाणे पावसाचे संकट ओढावले होते. अनेक पिकांचे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील अतोनात नुकसान झाले होते. शासनाने झालेल्या नुकसानीचा विचार करता खरिपानंतर आता रब्बी हंगाम २०२१ - २२ मधील पीक विमाही देऊ केला आहे.
➡️यासाठी राज्य शासनाच्या हिश्याची असलेली १८७ कोटी १५ लाख हजार ७३ रुपयांची रक्कम भारतीय कृषी विमा कंपनी, इक्फो टोकीयो जनरल इन्शुरस कंपनी लि. , भारती अॅक्सा जनरल इन्शुरस कं.लि. , बजाज अलियान्स इन्शुरस कंपनी, एचडीएफसी अग्रो इन्शुरस कंपनी लि. या 6 कंपन्यांना रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
➡️त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील \पीक विमा मिळणार आहे. ३० सप्टेंबर २०२२ अखेरपर्यंत या पीक विमा रक्कमेचे वाटप होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
➡️संदर्भ: Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.