कृषी वार्ताTV9 Marathi
सरकारचा २०२२-२३ च्या हंगामासाठी धडाकेबाज निर्णय!
➡️ केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने २०२२-२३ च्या हंगामासाठी रब्बी पिकांचं किमान आधार मूल्य (MSP) निश्चित केले आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर पिकांचे नवीन दर जाहीर करण्यात आले.
➡️ रब्बी पिकांसाठी MSP अर्थात किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशभरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
रब्बी पिकांसाठी MSP (२०२२-२३)
१) गव्हाचा MSP २०१५ रुपये प्रति क्विंटल
२) चना MSP ३००४ रुपये प्रति क्विंटल
३) जवस MSP १६३५ रुपये प्रति क्विंटल
४)मसूर डाळ MSP ५५०० रुपये प्रति क्विंटल
५) सूर्यफूल MSP ५४४१ रुपये प्रति क्विंटल
६) मोहरी MSP ५०५० रुपये क्विंटल
➡️ गेल्या वर्षीच्या तुलनेत कोणत्या पिकाच्या MSP मध्ये गव्हाच्या एमएसपीमध्ये ४० रुपयांची वाढ,हरभऱ्याच्या एमएसपी १३० रुपयांनी वाढली,जवसाच्या एमएसपीमध्ये 35 रुपयांनी वाढ केली,मसूर डाळीचा एमएसपी ४०० रुपयांनी वाढला,सूर्यफूल एमएसपी ११४ रुपयांनी वाढली,मोहरीच्या एमएसपीमध्ये ४०० रुपयांची वाढ झाली आहे.
➡️ वस्त्रोद्योग क्षेत्राला १०,६८३ कोटी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि माहिती व विकास मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, पीएलआय योजना भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनविण्यात मदत करेल. PLI योजनेचा ७.५ लाख लोकांना थेट लाभ होईल.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-TV9 Marathi,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.