AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी खास ऑफर!
समाचारNews 18 lokmat
सणासुदीत SBI ची ग्राहकांसाठी खास ऑफर!
➡️ भारतातली सर्वांत मोठी क्रेडिट कार्ड कंपनी एसबीआय कार्डने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी 'दमदार दस' कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. ही ऑफर ३ ऑक्टोबर २०२१ पासून म्हणजेच उद्यापासून पुढील 3 दिवसांसाठी असेल. ➡️ तीन दिवसांच्या मेगाशॉपिंग फेस्टिव्ह ऑफर अंतर्गत, रिटेल कार्डधारकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करण्याची संधी मिळेल. ऑफर अंतर्गत ग्राहक त्यांच्या खरेदीवर १० टक्के कॅशबॅक घेऊ शकतात. ➡️ या ऑफरअंतर्गत कार्डधारक कोणत्याही वेळी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीनं पेमेंट करू शकतील.’ SBI कार्डनं या ऑफरद्वारे कार्डधारकांना सोयीस्कर, सुलभ आणि सुरक्षित पेमेंट सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वचनबद्ध असणार हि बाबही ग्राहकांपर्यंत पोहोचवायची आहे. ➡️ फेस्टिव्ह ऑफर २०२१ अधिक आकर्षक करण्यासाठी, SBI कार्डनं डिजिटल जाहिरात मोहीम सुरू केली आहे. हा कॅशबॅक मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीज, टीव्ही आणि मोठी उपकरणं, लॅपटॉप आणि टॅब्लेट, होम फर्निशिंग, किचन उपकरणं, फॅशन आणि लाइफस्टाइल, स्पोर्ट आणि फिटनेस यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर उपलब्ध असेल. यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्युज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
8
0
इतर लेख