AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रा-लिंबू-मोसंबी पिकातील कीड नियंत्रण!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
संत्रा-लिंबू-मोसंबी पिकातील कीड नियंत्रण!
➡️ सिट्रस सिला लक्षणे - ही कीड कोवळे शेंडे, पाने, देठ व कळ्यातील रस शोषून घेत असल्याने शेंडे सुकतात. कळ्या गळून पडतात. नियंत्रण - इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) १०० मि.लि. किंवा थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @४० ते ८० ग्रॅम प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार दुसरी फवारणी दहा दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी. ➡️ पाने पोखरणारी अळी 1) अळी पानांच्या आतील हरितद्रव्य खाते. पानांवर पारदर्शक, नागमोडी पोखरलेले पांढरे चट्टे दिसतात. अळी आत असल्यामुळे बाहेरून दिसत नाही. 2) पाने आकाराने लहान, चुरगळलेली राहतात. तसेच पाने आखडून सुकतात, गळून पडतात. 3) झाडांची वाढ खुंटते, फूल व फळधारणेवर परिणाम होतो. 4) लहान किंवा मोठ्या झाडांवर नवीन नवतीवर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. नियंत्रणासाठी - नॉव्हेल्युरोन @५ मि.ली किंवा इमीडॅक्लोप्रीड @२.५ मि.लि. किंवा थायडीकार्ब @१० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ] संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
15