AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रा पिकात फुलकळी निघण्यासाठी आणि फळधारणे साठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
संत्रा पिकात फुलकळी निघण्यासाठी आणि फळधारणे साठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
संत्रा पिकात मृग बहार घ्यायचा असेल तर पिकातील ताण संपल्यानंतर झाडाच्या वाळलेल्या काड्या काढून जमिनीतून कुजलेले शेणखत, मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक असलेल्या खतांची मुबलक मात्रा द्यावी व पिकात नियमित पाणी द्यावे. तसेच फुटवे निघून जास्तीत जास्त फुले लागण्यासाठी ०:५२:३४ विद्राव्ये खत @ ३ ग्रॅम आणि अमिनो ऍसिड २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन पहिली फवारणी करावी. तसेच फुले दिसायला लागताच चिलेटेड कॅल्शिअम १ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन दुसरी फवारणी करावी.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
84
27