AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
संत्रा पिकातील तपकिरी फळ कूज व्यवस्थापन:
गुरु ज्ञानAgrostar
संत्रा पिकातील तपकिरी फळ कूज व्यवस्थापन:
🌱जास्त आर्द्रता, कमी तापमान व अपुरा सूर्यप्रकाश अश्या वातावरणामुळे संत्रा झाडाच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील पानांवर व फळांवर तपकिरी व काळ्या रंगाच्या बुरशीची लागण होते. कालांतराने फळे सडून त्यांची गळ होते. यासाठी उपायोजना म्हणून सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची योग्य विल्हेवाट लावून बाग स्वच्छ करावी. त्याचबरोबर कॉपर ऑक्सि क्लोराईड 50% WG घटक असणारे कूपर 1 @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. व जमिनीतून ट्रायकोडर्मा हार्जियानम 100 ग्रॅम व सुडोमोनास फ्लुरोसन्स 100 ग्रॅम 1 किलो शेणखतात मिक्स करून प्रति झाडास द्यावे. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0