क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनकृषी जागरण
संतुलित पशु खाद्य घरगुती ‘असे’ बनवा
जनावरांसाठी संतुलित आहार खूप महत्वाचा आहे. या आहारामुळे जनावरांचे दुधाचे उत्पादन वाढते व ते निरोगी ही राहतात. हे संतुलित पशुखाद्य घरगुती सहजपणे तयार करता येते ते खालीलप्रमाणे: १०० किलो संतुलित पशुखाद्य बनविण्याची कृती - • दाणे - (मका, ज्वारी, गहू आणि बाजरी) यांचे प्रमाण साधारणतः ३५ टक्क्यांपर्यंत असावे. • पेंड (भुईमूग व मूग पेंड) यांचे प्रमाण साधारणतः ३२ किलो असे आवश्यक आहे. यांपैकी कोणतीही एक पेंड दाण्यामध्ये मिसळून घ्यावी. • टरफले / भुसा (गहू, हरभरा, डाळी, धान) यांचे प्रमाण साधारणतः ३५ किलो आवश्यक आहे. • खनिज मिश्रण २ किलो आणि मीठ १ किलो घ्यावे. वरील सर्व नमूद केलेले पदार्थ एकत्र मिसळून जनावरास देऊ शकता. दाणे मिश्रित संतुलित पशुखाद्य किती प्रमाणात द्यावे. गाईसाठी १.५ किलो आणि म्हशीसाठी २ किलो प्रति दिवस द्यावे. दुधावर असणाऱ्या गाईला १ लिटर दुधामागे ४०० ग्रॅम आणि म्हशींसाठी ५०० ग्रॅम अधिक पशुखाद्य द्यावे. सहा महिन्यापेक्षा जास्त दिवसांची गाभण गाय किंवा म्हैस असल्यास, त्यास १.५ किलो प्रति दिवस संतुलित पशुखाद्य द्यावे. वासरांना त्यांचे वय आणि वजन यानुसार साधारणतः १ ते २.५ किलो प्रति दिवस या प्रमाणात पशुखाद्य द्यावे. संदर्भ - कृषी जागरण
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
575
1
संबंधित लेख