गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
शेवगा पिकातील छाटणी व्यवस्थापन
➡️शेवग्याचे उत्पादन तंत्र हे मुख्यत्व छाटणीवर अवलंबून असते.
➡️छाटणी न केल्यास एकच शेंडा वाढून कमी उत्पादन येते तसेच शेंगांची काढणी करणे अवघड जाते.
➡️ त्यामुळे शेवगा लागवडीनंतर 4 ते 6 महिन्यात जमिनीपासून 2 ते 2.5 फुटावर मुख्य शेंडा खुडावा व जुनी बाग असल्यास शेंगांची काढणी झाल्यावर जमिनीपासून 2 ते 3 फुटापर्यंत झाडाची उंची ठेऊन फांद्याची छाटणी करावी.
➡️जेणेकरून शेंडा न वाढता बाजूने नवीन फांद्या फुटून बहार चांगला येतो. कीड व रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी छाटणी नंतर लगेच कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी करावी. शक्यतो थंडी मध्ये छाटणी करणे टाळावे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.