AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेवगा पिकातील छाटणी व्यवस्थापन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
शेवगा पिकातील छाटणी व्यवस्थापन
शेवग्याचे उत्पादन तंत्र हे मुख्यत्व छाटणीवर अवलंबून असते. छाटणी न केल्यास एकच शेंडा वाढून कमी उत्पादन येते तसेच शेंगांची काढणी करणे अवघड जाते त्यामुळे शेवगा लागवडीनंतर ४ ते ६ महिन्यात जमिनीपासून 2 ते 2.5 फुटावर मुख्य शेंडा खुडावा व जुनी बाग असल्यास शेंगांची काढणी झाल्यावर जमिनीपासून 2 ते 3 फुटापर्यंत झाडाची उंची ठेऊन फांद्याची छाटणी करावी. जेणेकरून शेंडा न वाढता बाजूने नवीन फांद्या फुटून बहार चांगला येतो. छाटणी नंतर लगेच कॉपर ऑक्सि क्लोराईड ५० % डब्ल्यू पी @ 2.5 ग्रॅम + क्लोरोपायरीफॉस २० % ईसी @ 2 मिली प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. शक्यतो थंडी मध्ये छाटणी करणे टाळावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
87
0
इतर लेख