पशुपालनअॅग्रोवन
शेळीपालनातील पैदाशीच्या नराचे महत्त्व
पैदाशीचा नर निवडताना जातीशी साधर्म्य असणारा, दीड ते दोन वर्षे वयाचा, जुळ्यांतील एक असणारा, सुदृढ, उत्तम प्रजोत्पादन क्षमता असणारा निवडावा, म्हणजे त्याच्यापासून जन्माला येणारी पुढील पिढी चांगल्या गुणवत्तेची होईल.
शेळीची निवड -
• पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानेच शेळ्यांची खरेदी करावी.
• साधारणपणे एक वेत झालेल्या शेळीची निवड करावी. यावरूनच सर्व इतर गुणधर्माविषयी माहिती मिळेल. उदा. करडांची संख्या, दूध उत्पादन, आजार, वर्तणूक इ.
• शेळीची वंशावळ पाहून खरेदी केल्यास उत्तम. तिची आई जुळी करडे देणारी असावी.
• शेळीचे वय, करडांची संख्या तसेच दूध देण्याचे प्रमाण या बाबी तपासाव्यात.
• शेळी चपळ, आकाराने मोठी, केस मऊ व चमकदार असावेत.
• दुभती शेळी असेल तर तिची कास पाहून, दूध काढून पाहणे महत्त्वाचे आहे.
• तोंडापासून ते शेपटीपर्यंत शेळी लांब, सरळ असावी.
पैदाशीचा नर निवडताना -
• दाशीचा नर चपळ अाणि दोन जुळ्या नरांपैकी असावा. त्यामुळे पुढील पिढी चांगली करडांची संख्या देणारी निपजेल.
• कळपामध्ये सुदृढ व त्या त्या जातीचे गुणधर्म दर्शविणारा नर असावा.
• कोणतेही शारीरिक व्यंग नसावे.
• दिसायला उंच, लांब असावा. मानेवर सिंहासारखे आयाळ असावे.
• नराची प्रजोत्पादन क्षमता चांगली असावी.
संदर्भ - अॅग्रोवन