क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे परीक्षण करण्याचे महत्व जाणून घ्या.
पाणी परीक्षणाचे महत्व - ➡️ पाण्यातील क्षारता कळण्यासाठी व कमी व जादा प्रमाणातील क्षारांवर योग्य तो उपाय करण्यासाठी. ➡️ पाण्याचा सामू जाणून घेण्यासाठी. ➡️ पिकास पाण्याची नियोजन ठरविण्यासाठी. ➡️ पाण्यापासून होणारे संभाव्य धोके अथवा फायदे यांचा अंदाज येण्यासाठी. ➡️ या निदानांवरुन कोणत्या प्रकारचे पिक जमिनीस योग्य आहे हा निष्कर्ष काढता येतो. ➡️ ड्रीप मधून द्यावयाच्या खतांच्या मात्रांचे अचुक नियोजन करता येते. ➡️ बहुमोल पाण्याचे नियोजन व बचत शक्य होते. नमुना कसा घ्यावा? ➡️ विहिरीतील पाण्याचा नमुना घ्यावयाचा असल्यास विहिरीच्या मध्यभागातील पाणी बादलीच्या साहाय्याने ढवळून काही बादल्या पाण्याबाहेर उपसून टाकल्यानंतर पाण्याचा नमुना घ्यावा. ➡️ पाणी नमुना घेण्यासाठी सुरवातीला आपल्या विहिरीतील मोटार किंवा बोअरची मोटार ५ ते १० मिनिटे चालु ठेउन त्यानंतर येणारे पाणीच तपासणीसाठी घ्यावे. ➡️ नदी, ओढे पाण्याचा नमुना वाहत्या पाण्यातून घ्यावा. नमुना घेताना घ्यावयाची काळजी- ➡️ स्वच्छ मिनरल पाण्याची बाटली घेऊन त्यामध्ये ५०० मिली ते १ लिटर एवढ्या प्रमाणात पाणी परिक्षणासाठी द्यावे. ➡️ नमुन्याची वापरलेली काचेची किंवा प्लॅस्टिकची बाटली कोणत्याही औषधाची नसावी. ➡️ बाटली धुण्यासाठी सोडा, निरमा किंवा राख यांचा वापर करू नये. ➡️ घेतलेला पाण्याचा नमुना २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा. खालील माहितीसह पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा- ➡️ शेतकऱ्याचे नाव व पूर्ण पत्ता ➡️ शेताचा सर्व्हे क्रमांक ➡️ विहिरीचे ठिकाण, पाण्याची पातळी ➡️ नमुना घेतल्याची तारीख ➡️ जमिनीची माहिती - हलकी, मध्यम, भारी ➡️ जमिनीचा उतार- प्रकार, उतार, खोली ➡️ मागील हंगामातील पीक ➡️ रासायनिक खतांचा वापर ➡️ पुढील हंगामातील घ्यावयाची पिके पाणी परीक्षण कुठे करतात? ➡️ कृषी विभाग माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा. ➡️ कृषी महाविद्यालय माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा. ➡️ खाजगी माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा. ➡️ कृषी विज्ञान केंद्र माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
44
7