शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेतीसाठी क्षारयुक्त पाण्याचे व्यवस्थापन!
पाणी क्षारयुक्त होण्याची कारणे: सिंचनासाठी पाण्याचा शेतीसाठी अमर्याद वापर, एकसारखी पिक पद्धती, पावसाचे प्रमाण कमी, सेंद्रिय पदार्थांचे जमिनीतील कमी होत असलेले प्रमाण, निचऱ्याचा अभाव आणि क्षारपड जमिनींचे वाढत असलेले क्षेत्र या सर्व बाबींमुळे भूगर्भातील पाणी क्षारयुक्त (मचूळ) झाले आहे. जास्त क्षारयुक्त पाणी मनुष्याच्या पिण्यात आले तर मुतखड्याचे आजार जडतात, कारण या भाज्यांमध्ये ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असल्याने पाण्यातील कॅल्शियम, सोडियम सारख्या क्षारांबरोबर संयोग होऊन क्षारखडे मुत्राक्षयात तयार होतात. क्षारयुक्त पाणी जमिनीत वापरताना घ्यावयाची काळजी: • हलक्या ते मध्यम चांगला निचरा असलेल्या जमिनीस क्षारयुक्त पाणी वापरावे. काळ्या खोल जमिनीस बाजूने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. • सेंद्रिय खतांचा (शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत इ.) वापर प्रत्येक पिकास शिफारशीनुसार करावा. • दोन ते तीन वर्षातून एकदा तरी धैचा किंवा ताग जमिनीत पेरून नंतर फुले आल्यावर गाडावेत. • क्षारयुक्त पाणी चांगल्या पाण्यात मिसळून पिकांना दयावे किंवा आलटून पालटून दयावे. • क्षारयुक्त पाण्याचा वापर अमर्याद न करता मर्यादित हलके परंतु वारंवार दयावे. • पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करावा. • पेरणीसाठी बियाणांचा 15 ते 20 टक्के शिफारशीपेक्षा जास्त वापर करावा. • पिकांची लागवड सपाट वाफ्यात न करता सारी वरंबा पद्धतीने करून लागवड वरंब्याच्या बगलात करावी. • क्षार प्रतिकारक पिकांची निवड करावी. उदा. गहु, बाजरी, मका, ज्वारी, सोयबीन, कापुस, उस, वांगे, कोबी, पालक, शुगरबीट, आवळा, पेरू, चिक्कू, इ. • मात्र क्षार संवेदनशील पिकांची लागवड करू नये. उदा. वाटाणा, मुग, उडीद, चवळी, तीळ, घेवडा आणि लिंबूवर्गीय फळपिके (संत्रा, मोसंबी, लिंबू), स्ट्रोबेरी इ. अशा प्रकारे पाणी क्षारयुक्त असल्यास वरीलप्रमाणे बाबींचा अवलंब करूनच मचूळ पाण्याचे व्यवस्थापन करावे. अन्यथा माणसांचे आणि जनावरांचे किंबहुना जमिनीची आरोग्य धोक्यात येईल आणि त्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
3
इतर लेख