जैविक शेतीAgrostar
शेतीतील टाकाऊ घटकांपासून बायोगॅस कसा बनवावा?
➡️टाकाऊ घटकापासून संपत्ती या संकल्पनेत बायोगॅस महत्त्वाचा आहे. कारण त्यामध्ये जनावरांचे शेण व मूत्र, कुक्कुटपालनातील विष्ठा, शेतीतील पीक अवशेष, काढणीपश्चात किंवा विक्रीदरम्यान शिल्लक टाकाऊ घटक, ऊस कारखान्यातील मळी, डेअरी, पेपर मिल अशा विविध शेतीपूरक व्यवसायातील टाकाऊ घटक अशा घटकापासून ज्वलनयोग्य वायू तयार केला जातो.
➡️बायोगॅस स्लरीमध्ये पाणी ९३ %, सेंद्रिय घटक ४.५%, इनऑरगॅनिक घटक २.५ % असतात. यात जनावरांचे मूत्र मिसळल्यास कुजण्याची प्रक्रिया जलद होते. स्लरीमधील कार्बन : नत्र गुणोत्तर वाढते.
➡️बायोगॅसची पर्यावरणपूरकता :
👉🏻बायोगॅस युनिटमुळे जनावरांचे शेण व मूत्राचे रूपांतर जैविक व सेंद्रिय खतामध्ये होते. अन्यथा, जमिनीवर पडून पावसाच्या पाण्यासोबत जलस्रोत प्रदूषित होतात.
👉🏻बायोगॅसमधून हवारहित स्थितीत कुजवल्यामुळे जनावरांच्या विष्ठेतील मानवासाठी हानिकारक व आजार पसरवणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. दुर्गंधी ७० ते ९५% पर्यंत कमी होते.
👉🏻बायोगॅसमुळे सेंद्रिय पदार्थांच्या कुजण्यातून तयार होणारे हरितगृह वायूंचे प्रदूषण कमी होते. यात कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, हॅलोजनेटेड वायू, ओझोन, नायट्रोजन ऑक्साइड इ.चा समावेश होतो. हे वायू जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत मानले जातात.
➡️बायोगॅस स्लरीची शेतीसाठी उपयुक्तता :
👉🏻मातीतील नैसर्गिक नत्र, स्फुरद व सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते.
👉🏻मातीचा खारवटपणा कमी होऊन, भुसभुशीत होते.
👉🏻पाणी व अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
👉🏻सूक्ष्मजीवांची (विशेषतः ॲक्टीनोमायसेट) संख्या वाढते.
👉🏻पिकातील वाळवीची समस्या कमी होते.
👉🏻शेणाद्वारे बिया पसरण्यामुळे वाढणारी तणे बायोगॅस स्लरीच्या वापराने फारशी वाढत नाहीत.
👉🏻पिकाची उत्पादकता वाढते.
➡️ संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.