AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतीच्या नुकसानीचे ड्रोनमधून होणार ई- पंचनामे!
कृषि वार्ताAgrostar
शेतीच्या नुकसानीचे ड्रोनमधून होणार ई- पंचनामे!
➡️नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई-पंचनामे करण्यात येणार आहेत.शेतीपीकाच्या तात्काळ सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली दिली. ➡️यामुळे मदतीपासून कोणीही वंचीत राहणार नाही. गेल्या काही वर्षांपासून सतत होणारा हवामानबदल, अवकाळी पाऊस, गारपीट आणि अवर्षण आदी अनेक समस्यांनी शेतकरी ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय केले जात असले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून हक्काच्या मदतीची गरज असते. ➡️नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून (एसडीआरएफ) द्यावयाच्या मदतीचे वाढीव दर लागू करण्याबरोबरच आता तीन हेक्टर मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2