AgroStar
कृषि जुगाड़माय किसान दोस्त
शेतात सोप्या पद्धतीने युरिया देण्याचा बेस्ट जुगाड
• सर्वात अगोदर १ किंवा १.२५ इंच आकाराचा पाईप घ्यावा. • साहित्य - मार्कर, दोन क्लिप, खिळे, तिरका लाकडाचा तुकडा, रबर, स्प्रिंग, बेसिंग पाईप, दोन झाकणे, टी-आकाराचे जॉइंटर इत्यादी घ्या. • १.२५ इंच पाईपच्या एका बाजूला त्रिकोण तर दुसर्या बाजूला आयात आकार काढा आणि तो कट करून घ्या. • १ इंचाच्या पाईपवरही त्रिकोण आकार काढून दोन्ही पाईप्स एकमेकांना जोडा. • मग त्यात लाकडाचा तुकडा टाका. जर लाकूड सैल बसला असेल तर चिकट पट्टीने घट्ट करा. • १.२५ इंच पाईपवर एक क्लिप जोडून नटबोल्टने घट्ट करा. नटबोल्ट लावताना रबर देखील लावा. यानंतर लगेचच क्लिपच्या दुसर्या टोकाला खिळा लावून रबरने घट्ट करा. • पाईपच्या तळाशी झाकण लावून झाकणावर बेसिंग पाईप ठेवा आणि चिकट पट्टीसह घट्ट करा. • मग एक पिशवी तयार करा ज्याद्वारे खत सहजपणे जोडता येईल. त्या पिशवीत एका कोपऱ्याला छिद्र करून दुसरे झाकण तिथे ठेवा जेणेकरून सहजपणे शेतात खत घालता येते. संदर्भ: माय किसान दोस्त आपणदेखील असाच काही नवीन जुगाड केला आल्यास आम्हाला जरूर पाठवा तसेच हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
459
3
इतर लेख