समाचारAgrostar
शेतसारा भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा सुरु!
➡️शेतसारा हा पारंपरिक कर आहे. इंग्रजांच्या काळापासून शेत जमिनीवर हा कर लावण्यात येतो. पूर्वी शेतसारा राज्याला महसूल देणारा सर्वांत महत्त्वाचा कर होता. काळानुरूप विकास होत गेला. मात्र, या कराची वसुली आजही सुरू आहे. जमिनीच्या क्षेत्रानुसार या कराची अंमलबजावणी होते. दरवर्षी हा कर भरावा लागतो. परंतु, हा कर अत्यल्प असल्याने या कराची वसुली नियमित होत नाही.
➡️परिणामी, कराची थकबाकी वाढते. त्यामुळे दरवर्षी नागरिकांना या कराची माहिती मिळावी, तसेच घरबसल्या हा कर भरता यावा, शासनाचा महसूल वाढावा, यासाठी ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे.
➡️https://echawadicitizen.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर शेतसारा भरता येणार आहे. या सुविधेमुळे खातेदारांना त्यांच्या शेतसाऱ्याची रक्कम आणि थकीत कराची माहिती ऑनलाइन मिळेल. तसेच, त्यांना घरबसल्या कर भरता येईल. यामुळे कर वसुलीमध्ये सुलभता होईल.शेतसारा हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा महसूल आहे. मात्र, हा कर अल्प असल्याने वसुलीत अडचणी येत आहेत. ऑनलाइन सुविधामुळे कर वसुलीत वाढ होण्याची अपेक्षा आहे
➡️या सुविधामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना घरबसल्या कर भरता येईल आणि त्यांना तलाठी कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
➡️संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.