AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतमाल तारण कर्ज योजना !
योजना व अनुदानAgrostar
शेतमाल तारण कर्ज योजना !
➡️शेतकरी आपल्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारात घेऊन जातात. बाजारात शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होते.मात्र हाच शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी नेला तर चांगला बाजारभाव मिळू शकतो. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा म्हणून कृषि पणन मंडळ सन १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबविण्यात येत आहे. ➡️शेतमालाच्या काढणीनंतर बाजारभावामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ राज्यातील बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतमाल तारण कर्ज योजना राबवत आहे. कर्ज कसे दिले जाते आणि योजनेचे स्वरूप कसे आहे? याबद्दल आपण सविस्तर पाहूया. 1) शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामा तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत 6 टक्के व्याजदरांना सहा महिने कालावधीसाठी कर्ज त्वरित उपलब्ध होते. 2) बाजार समितीच्या गोदामात ठेवलेल्या शेतकऱ्यांचे शेतमालासाठी गोदाम भाडे विमा देखरेख खर्च अधिक खर्चाची जबाबदारी बाजार समितीवर असल्याने शेतकऱ्यांना भुरदंड बसत नाही. 4) सहा महिन्याच्या आत कर्ज परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याज सवलत मिळते ५) स्वनिधीतून तारण कर्ज राबवणाऱ्या बाजार समित्यांनी वाटप केलेल्या तारण कर्ज रकमेवर तीन टक्के व्याज सवलत तसेच अनुदान स्वरूपात मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कृषी पणन मंडळाची विभागीय कार्यालय येरवडा पुणे 6 येथे प्रत्यक्ष dsopune6@gmail.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1
इतर लेख