AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतमालावर आता ४ तासात कर्ज
योजना व अनुदानAgrostar
शेतमालावर आता ४ तासात कर्ज
➡️ शेतीमाल तारण ठेवून कर्ज वितरित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या सहकार्यातून एक महत्त्वाची योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतमालाच्या एकूण किमतीच्या 70 टक्के एवढी रक्कम कर्ज स्वरूपात दिली आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत संपूर्ण राज्यभरात शंभर कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ➡️खरंतर गोदामात ठेवलेला शेतमाल तारण ठेवून आधी देखील शेतकऱ्यांना कर्ज मिळत होते. मात्र या कर्जासाठी शेतकऱ्यांना चार ते पाच दिवस वाट पहावी लागत असे. परंतु आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शेतकऱ्यांना शेतमाल तारण ठेवून त्वरित कर्ज मिळावे यासाठी पुढाकार घेतला आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल धारण ठेवून अवघ्या चार तासात कर्जाचे वितरण केले जाणार आहे. ➡️दरम्यान शेतकरी बांधवांना शेतमाल तारण ठेवून जर कर्ज घ्यायचे असेल तर यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन एप्लीकेशनच्या माध्यमातून किंवा वखार महामंडळाच्या राज्यातील 202 गोदामांमध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. हा अर्ज सादर झाला की लगेच चार तासाच्या आत संबंधित शेतकऱ्यांना कर्जाचे वितरण होणार असल्याची माहिती राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे. ➡️वखार महामंडळातील गोदामात ठेवलेला शेतमाल तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर सदर शेतकऱ्याची केवायसी केली जाते. ➡️ही प्रक्रिया पार पडल्यानंतर मग अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज ब्लॉक चेन तंत्रज्ञानाद्वारे थेट बँकेच्या मुख्यालयात जमा केला जातो. ➡️मग यानंतर कागदपत्रांची छाननी केली जाते.मग अर्जाची छाननी झाली की ऑनलाइन पद्धतीनेच शेतकऱ्याच्या गोदाम पावतीवर कर्जाचा बोजा चढवून खात्यात कर्जाची रक्कम जमा केली जात आहे. ➡️या योजनेची एक विशेषता म्हणजे शेतमाल तारण ठेवून कर्ज घेऊ इच्छिणारा शेतकरी राज्य सहकारी बँकेचा खातेदार नसला, म्हणजेच इतर कोणत्याही बँकेचा खातेदार असला तरी देखील त्याला कर्ज मंजूर होऊ शकते. ➡️या योजनेअंतर्गत सोयाबीन, हळद, तूर, मका, हरभरा, डाळ यांसारखा शेतीमाल तारण ठेऊन कर्ज मिळवता येणार आहे. ➡️साहजिकच या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे त्यांना शेती कसण्यासाठी लवकरच भांडवल उपलब्ध होणार आहे. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
26
0