कृषी वार्ताTV9 Marathi
शेततळ्यांच्या संदर्भात राज्य सरकारची मोठी घोषणा!
👉 आता राज्यातील शेततळ्यांसाठी राज्य सरकारने तब्बल ५२ कोटींचे अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सरकारच्या या घोषणेमुळे राज्यातील १० हजार ७४४ शेतकऱ्यांना रखडलेले अनुदान मिळणार आहे. राज्यातील १०७४४ शेतकऱ्यांना मिळणार अनुदानाचा लाभ 👉 रखडलेल्या अनुदानापोटी राज्य सरकारने तब्बल ५२ कोटी रुपये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून रखडलेले अनुदान अखेर शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे. याकिरता स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी अनुदानाच्या रकमेची मागणी केली होती. त्यानुसार कृषी आयुक्त यांनीही पाठपुरावा केल्याने अनुदनाची रक्कम मिळालेली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा केली जाणार आहे. असे वाढत गेले शेततळ्यांचे जाळे 👉 शेततळ्यासाठी अनुदान देण्याची सुरवातच मुळात नाशिक जिल्ह्यापासून झाली होती. त्यानंतर २००९ मध्ये खानदेशासाठी हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यानुसार फक्त नंदूरबारसाठी दोन कोटी रुपये खर्च करून ४०० शेततळी खोदण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेततळ्याची गरज बघता पुढे ही संकल्पनेचे योजनेत रुपांतर झाले. रोजगार हमी योजनेतू २००९ ते २०१२ या काळात ९० हजार शेततळी खोदण्यात आली होती. त्यानंतर मात्र मागेळ त्याला शेततळे या योजनेमुळे तर गावोगावी शेततळे झाले. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
27
5
इतर लेख