AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यानों! आता अवकाळीच्या नुकसानीची मिळणार मदत!
कृषी वार्तासकाळ
शेतकऱ्यानों! आता अवकाळीच्या नुकसानीची मिळणार मदत!
अवकाळी पावसामुळे मार्च, एप्रिल आणि मे 2021 या कालावधीत झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची माहिती राज्य सरकारने मागवली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना पत्र पाठवून नुकसानीचा पीकनिहाय अहवाल मागवला असून तो सोमवारपर्यंत सरकारला पाठवला जाणार आहे राज्यातील जवळपास 46 हजार 700 शेतकऱ्यांना 55 ते 58 कोटींचा फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. कोरोनाच्या संकटाशी दोन हात करतानाच शेतकऱ्याला अवकाळीच्या संकटाला सामोरे जावे लागले. मार्च-एप्रिल व मे महिन्यातील अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका पुणे, नाशिक, ठाणे विभागातील बहुतांश जिल्ह्यांसह अकोला, अमरावती, बुलडाणा येथील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना बसला. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ व माळशिरस तालुक्‍यांचाही समावेश आहे. द्राक्ष पिकासह केळी, बेदाणा, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यभरातील नुकसानीचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला असून त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित तीन ते साडेतीन हजार शेतकऱ्यांचे 11 कोटींचे तर उर्वरित जिल्ह्यांमधील 43 हजार शेतकऱ्यांचे 45 ते 46 कोटींचे नुकसान झाले आहे. तत्पूर्वी, संबंधित तालुक्‍यांनी नुकसानीचे पंचनामे करावेत, अशा सूचना तहसीलदारांना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी पंचनामेही करून ठेवले, परंतु सरकारकडून मदतीची काहीच घोषणा न झाल्याने ते अहवाल त्यांच्याकडेच पडून होते. आता सोमवारी सरकारने अवकाळीच्या नुकसानीची माहिती मागविल्याने ते अहवाल शासनाला सोमवारपर्यंत पाठविले जाणार आहेत. कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या बळिराजाला मदतीचा हात देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरhttps://www.youtube.com/watch?v=7tuTqxODOTo क्लिक करा. संदर्भ:- प्रभुदेवा जीआर व शेती योजना हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरhttps://www.youtube.com/watch?v=7tuTqxODOTo क्लिक करा. संदर्भ:- सकाळ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
1
इतर लेख