AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्याने बनविला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर !
ट्रॅक्टरAgrostar
शेतकऱ्याने बनविला बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर !
🚜शेतीमध्ये आता विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अगदी शेतीच्या पूर्वमशागतीपासून ते पिकांच्या काढणीपर्यंत यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.पिकाच्या काढणीसाठी विविध प्रकारचे हार्वेस्टर, फवारणीसाठी विविध प्रकारचे स्प्रेयर पंप कधी मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये वापरले जात आहेत. या सगळ्या यंत्रांमध्ये शेतीची पूर्व मशागत करण्याचे महत्त्वाचे काम आता ट्रॅक्टरद्वारे पार पाडले जाते. 🚜परंतु सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर पेट्रोल आणि डिझेल इंधनाच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर शेतात करणे खूप खर्चिक झाले आहे. या दरवाढीचा फटका हा ट्रॅक्टर लाच नाही तर इतर वाहनांना देखील बसला आहे. त्यामुळे अनेक इलेक्ट्रिक वाहनेबाजारात उपलब्ध होत आहेत.या पार्श्वभूमीवरचपेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्याप्रसंगी एक दिलासादायक बातमीसमोर आली आहे.ती म्हणजे गुजरात मधील एका तरुण शेतकऱ्यानेचक्क बॅटरीवर ऑपरेट होणारा ईलेक्ट्रिक ट्रॅक्टर बनवला असून तो सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेचा विषय बनला आहे 🚜 गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील कलावाड तालुक्यातील पिप्पर या गावात राहणाऱ्या महेश नावाच्या तरुण शेतकऱ्यांनी हा बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर बनवला असून या ट्रॅक्टरला त्याने व्योम हे नाव दिले आहे. इंधन दरवाढीच्या दरम्यान हा ट्रॅक्टर खूप दिलासादायक ठरू शकतो. 🚜या ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये पुढीप्रमाणे: हहा एक उत्तम वैशिष्ट्यांनी युक्त ट्रॅक्टर असून 22 एचपी क्षमता असलेला ट्रॅक्टर आहे. त्यांमध्ये 72 वॅट लिथियम बॅटरी असून याद्वारे तो चालवला जातो. या ट्रॅक्टर मध्ये दर्जेदार कॉलिटी च्या बॅटऱ्या बसविण्यात आल्यामुळे या बॅटरी यांना वारंवार बदलायची गरज नाही. तसेच यामध्ये या तरुण शेतकऱ्याने विविध तंत्रज्ञानाचा वापर करून काही वैशिष्ट्ये देखील समाविष्ट केले आहेत. जसे की, या ट्रॅक्टरचा वेग तुम्ही फोनवरून देखील नियंत्रित करू शकतात. 🚜संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
6