AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्याने पिकवली काळ्या मक्याची शेती!
नई खेती नया किसानMax Maharashtra
शेतकऱ्याने पिकवली काळ्या मक्याची शेती!
➡️शेतकरी आपल्या शेतात तांबडी,पांढरी मक्का लावतात हे माहीत होते. पण काळ्या मका वाण ही असतो व त्याची लागण करण्यात आली असल्याचे आजपर्यंत कधी ऐकण्यात आले नव्हते. या दुर्मिक अशा काळ्या मक्केचे उत्पादन घेण्याची किमया करमाळा तालुक्यातील रहिवाशी राम चौधरी शेतकऱ्यांने साधली आहे. त्यांनी ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून याची लागवड केली आहे. ➡️बारा महिने काळ्या मक्केचे उत्पादन घेता येते. या काळ्या मक्केचे उत्पादन तांबड्या आणि काळ्या मक्केपेक्षा 4 ते 5 क्विंटलने जास्त निघते. या मक्केला जास्त प्रमाणात पाणी लागत नाही. ऊसाच्या आंतरपीकातही चांगल्या प्रकारे उत्पादन घेता येते. उसाला जी रासायनिक खते वापरली जातात. त्यांचाच या मक्केसाठी उपयोग होतो. ➡️काळ्या मक्केची वैरण जनावरांना खायला घातल्यास दुधात वाढ होते काळी मक्का जनावरांना खाण्यासाठी अतिशय पौष्टिक अशी आहे. याची वैरण जर जनावरांना खायला घातल्यास 1 ते 2 लिटरने जनावरांच्या दुधात वाढ होते.आपल्या महाराष्ट्रात याचे उत्पादन अतिशय दुर्मिळ आढळते. ➡️काळ्या मक्केत कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न,प्रोटीन याचे प्रमाण जास्त,मनुष्याने याची भाकरी जर बनवून खाल्ली तर ही मक्का आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. या मक्केमध्ये कॅल्शियम, मिनरल्स, आयर्न, प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे या मक्केचा कलर काळा आहे. ➡️संदर्भ: Max Maharashtra, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
6