AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्याने जमीन राखायला ठेवले चक्क अस्वल!
व्हायरल जुगाडkrishi jagran
शेतकऱ्याने जमीन राखायला ठेवले चक्क अस्वल!
➡️पक्षी प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते यामुळे शेतकरी बांधव वेगवेगळ्या उपाययोजना करतो. मात्र शेतकरी आपल्या शेतात सतत पहारा देऊ शकत नाहीत, त्यामुळे जेव्हा शेतात कोणी नसतं वन्य प्राणी शेतात घुसतात आणि पिकाची नासाडी करतात.याच समस्येने त्रस्त झालेल्या तेलंगणातील एका शेतकऱ्याने डुक्कर, माकडे किंवा वन्य प्राण्यांपासून पीक वाचवण्याचा अनोखा मार्ग शोधला आहे. होय, या शेतकऱ्याने शेतातील पिकाचे रक्षण करण्यासाठी अस्वलाला कामावर ठेवले आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे, चला तर मग तुम्हाला जाणुन घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण? ➡️एएनआय यांच्या एका बातमीनुसार, तेलंगणातील सिद्धीपेट येथे राहणारे भास्कर रेड्डी या शेतकऱ्याने माकडे आणि रानडुकरांपासून त्यांच्या शेतीचे व पिकांचे संरक्षण करण्यासाठी एका माणसाला कामावर ठेवले आहे विशेष म्हणजे या माणसाला या शेतकऱ्याने अस्वलाचा पोशाख परिधान करायला सांगितले आहे. ➡️भास्कर रेड्डी सांगतात की, ते एका व्यक्तीला अस्वलचा पोशाख परिधान करून फिरायला सांगतात, शेतात फिरण्यासाठी या माणसाला महीना १५000 रुपये पगार दिला जातो. या कामाबद्दल सोशल मीडियावर लोक आपापली मते मांडत आहेत. काही लोक या कामाला गमतीदार म्हणत आहेत, तर अनेक लोक या कल्पनेचे खूप कौतुक करत आहेत. ➡️संदर्भ:- Krishi Jagran. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
1
इतर लेख