AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्याने केले नवीन वाण विकसित !
शेतीतील नवा शोध!कृषी जागरण
शेतकऱ्याने केले नवीन वाण विकसित !
➡️आता शेतामध्ये पारंपारिक शेतीबरोबरच शेती साठी उपयोगी असणारे नवीन प्रयोग केले जात आहेत. ➡️पुण्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावातील संदीप घोले या तरुण शेतकरीपुत्राने कांद्याचे नवीन ‘संदीप वाण’ विकसित केले असुन याची टिकवणक्षमता सात ते आठ महिन्याची आहे. ➡️महत्वाचं म्हणजे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शेतकरी पुत्राचा गौरवण्यात आले आहे. जाणुन घ्या कशा प्रकारे लागला शोध ➡️शेतकऱ्यांची फसवणुन थांबावी म्हणुन त्याने संशोधन करण्याचे ठरवले. आणि त्याने स्वतःच्या नावाची कांद्याची जात शोधुन काढली. ➡️कांदा लवकर खराब होत असल्यामुळे कांद्याचे भाव जरी वाढले तरी शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही. म्हणुन यावर आठ वर्षे संशोधन करुन ‘संदीप कांदा’ या वाणाची निर्मिती केली. विशेष म्हणजे वाणामुळे उत्पन्नात हेक्‍टरी सात ते आठ टणाचा फरक पडलाय. संदीप कांदा वाणाची वैशिष्ट्ये १) या नवीन कांद्याची साठवणक्षमता सात ते आठ महिने इतकी आहे. २) बाकीच्या कांद्याच्या तुलनेत हा कांदा ३ ते ४ महिने जास्त काळ टिकतो. ३) या कांद्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. संदर्भ:-कृषी जागरण, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
66
9