AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यानं चक्क घराच्या टेरेसवर फुलवली द्राक्षाची बाग!
शेतीतील नवा शोध!Marathi abplive
शेतकऱ्यानं चक्क घराच्या टेरेसवर फुलवली द्राक्षाची बाग!
➡️द्राक्ष शेतात पिकवली जातात हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु हीच द्राक्ष एखाद्या घराच्या गच्चीवर पिकवली जातात म्हटलं तर कुणाचा विश्वास बसेल का? असं प्रत्यक्षात घडलय. पुण्यापासून ३० ते ३५ किमी अंतरावर असणाऱ्या उरळीकांचन गावात एका शेतकऱ्याने दोन मजली बंगल्याच्या टेरेसवर चक्क द्राक्षाची बाग फुलवली. ➡️उरुळी कांचन परिसरात राहणारे ५८ वर्षीय भाऊसाहेब कांचन त्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय आहे. उरुळी कांचन परिसरात त्यांची सव्वा तीन एकर शेती आहे. ➡️त्यांनी दोन एकरात ऊस, तर दहा गुंठ्यात नारळ, सुपारी, आवळा, जांभूळ, पेरू, आंबा, डाळिंब, चिकू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची त्यांनी लागवड केली. कांचन यांनी साधारण सहा वर्षांपूर्वी घराच्या बाजूला द्राक्षाच्या दोन रोपांची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी टेरेसवरच द्राक्षाची बाग फुलवली. ➡️भाऊसाहेब कांचन २०१३ मध्ये शेतकरी सहलीच्या निमित्ताने युरोप दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी युरोपात हजारो एकर वर फुललेली द्राक्ष शेती पहिली. हे सर्व युरोपात होऊ शकते तर कृषिप्रधान देश म्हणून ओळख असणार्‍या भारतात हे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर आपणही अशाच प्रकारे द्राक्षाचे उत्पन्न घेऊ अशी खूणगाठ मनाशी बांधूनच ते भारतात परतले. ➡️भाऊसाहेब कांचन यांनी त्यांच्या द्राक्षाच्या बागेबद्दल सांगितलं, २०१५ साली कांचन परिसरात असलेल्या शेतालगत त्यांनी घराचं बांधकाम सुरू केले. बंगल्याचे बांधकाम सुरू असतानाच त्यांनी या बंगल्याच्या भिंतीलगत द्राक्षाचे रोपे टाकली. मांजरीतील द्राक्ष संशोधन संस्थेतून त्यांनी मांजरी मेडिका जातीचं हे रोपे आणले होतं. ➡️हळूहळू ही वेळ वाढत गेली.. साडेतीन वर्षानंतर वाढत गेली. बंगल्याच्या गच्चीवर वेलीसाठी मांडवा सारखा आधार तयार केला. संपूर्ण मांडवभर या वेली पसरल्या होत्या. २०१९ पासून या वेलीवर द्राक्षाची घडं दिसू लागली. ➡️हळूहळू ही घडं वाढत गेली आणि आता भाऊसाहेब कांचन यांची गच्ची द्राक्षांचा घडांनी उलगडून गेली आहे. ही संपूर्ण भाग फुलवण्यासाठी त्यांना सहा हजार रुपयांचा खर्च आला आहे.आता या गचीत गेल्यानंतर आपण एखाद्या द्राक्षाच्या बागेत उभे आहोत की काय असाच फील येतो. संदर्भ:-Marathi abplive, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
2